बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:33 AM2024-11-14T09:33:00+5:302024-11-14T09:33:33+5:30

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले.

Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat says ncp sharad pawar | बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क राहाता (जि. अहिल्यानगर): बाळासाहेब थोरातांना निर्णयाचे आता अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? यावरून बरीच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. व्यासपीठावर थोरातही उपस्थित होते.

पवार म्हणाले, शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तेथे आहेत. राज्याचा कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही शरद पवार यांच्या सभा झाल्या. ज्यांनी साथ सोडली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमच्या भाषणावर बंदीची शक्यता : थोरात

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रभावती घोगरे व माझ्यावर लवकरच भाषणबंदी येणार असल्याची शक्यता आहे. तशा हालचाली निवडणूक आयोगाकडे सुरू झाल्या आहेत. या भागात गुलामीचे राजकारण चालू आहे.

Web Title: Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat says ncp sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.