विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुले कारागृहाच्या अधीक्षकपदी प्रदीप जगन्नाथ जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विसापूर कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची पदोन्नती होऊन बदली झाली. त्यानंतर सहा महिन्यांपासून अधीक्षकपदाचा प्रभार वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाशसिंग परदेशी यांच्याकडे होता. विसापूर कारागृहाच्या अधीक्षकपदी नव्याने रूजू झालेले प्रदीप जगताप येरवडा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना राजपत्रित अधिकारी गट- ब या पदावर पदोन्नती मिळून त्यांची विसापूर कारागृहाच्या अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. जगताप यांनी २०१३ मध्ये राष्ट्रपती पदक पटाकाविले आहे. २०१६ मध्ये राज्य सरकारने त्यांना डीजी मंडल पदकाने सन्मानित केले. त्यांचे मूळ गाव खटाव, जि. सातारा असून, त्यांनी कृषीची पदव्युत्तर पदवी व एम. एस. सोशालॉजीची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी ठाणे, सावंतवाडी, आटपाडी, अलिबाग, सांगली, कोल्हापूर व येरवडा आदी कारागृहात सेवा केलेली आहे. त्यांची आर्थर रोड कारागृहात अफजल कसाब याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठीही नियुक्ती करण्यात आली होती.
फोटो पासपोर्ट : १५ प्रदीप जगताप