अहमदनगर : प्रसिद्ध शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या नगरमधील स्टुडिओला रविवारी (दि़ १) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही़. प्रमोद कांबळे यांचा नगरमधील पाईपलाईन रोडवरील आॅक्सिलियम शाळेच्या पाठीमागे स्टुडिओ आहे़ या स्टुडिओमध्ये प्रमोद कांबळे विविध शिल्प आणि मुत्या तयार करतात़ तेथे शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे़ दुपारी अडीच वाजता ही आग लागली़ घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचे काम सुरु आहे़.
ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही़ या आगीत फायबरच्या मुर्त्या, कच्चा माल, पोस्टर असे सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे़ घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून, आमदार संग्राम जगताप यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली़ तीन बंबांना ही आग आटोक्यात येत नसल्यामुळे व्हीआरडीईचा अग्नीशमन बंब बोलावण्यात आला आहे़