तिसगाव : वाणिज्य व्यवस्थापनाबाबत अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल अमरापूर (ता. शेवगाव ) येथे शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे रेणूकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेराव यांचा सन्मन राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आला. वाणिज्य व्यवस्थापनातील शोधनिबंध प्रशांत भालेराव यांनी जागतिक स्तरावर सादर केला होता. कोरोनाच्या पार्श्वमूमीवर गोवा येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या कार्यक्रमात अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीर्फे भालेराव यांना मनद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
यावेळी झिंजुर्के महाराज म्हणाले, प्रशांत भालेराव यांनी वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. रेणुकामाता मल्टिस्टेटच्या देशभरात ११० शाखा त्यांनी सुरू करून त्या यशस्वीपणे चालविल्या आहेत.
रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने यांनी प्रशांत भालेराव यांच्या कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला. यावेळी प्राचार्य दिलीप फलके, डॉ. गणेश चेके, डॉ. भागीनाथ काटे, पाथर्डीचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, उद्योजक बबनराव म्हस्के, सरपंच विजय पोटफोडे, अरूण बोरूडे, विधीज्ञ प्रसाद फलके, श्रीमंत घुले, प्रशांत भालेराव यांच्या मातोश्री मंगल भालेराव, जयंती भालेराव, प्रज्ञेश भालेराव, अभिनेत्री रेणूका भालेराव, महेश लाडणे, दीपक भुकन, संतोष ढाकणे, बाळासाहेब सुसे, संदिप बोरूडे, धनंजय खैरे, मदन म्हस्के, किशोर गायकवाड, अशोक कळमकर, कैलास कळमकर, गणेश गरड, संदिप सुसे, संदिप बोरूडे, दीपक भापकर आदी उपस्थित होते. बाळासाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.