अहमदनगर : राज्य सेवा पुर्व परिक्षेकडे तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या परिक्षेला जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी हजर होते. राज्य सरकारने अचानक स्थगित केलेली राज्य सेवा पूर्व परिक्षा रविवारी ( दि. २१) रोजी पार पडली. अहमदनगर शहरातील तब्बल ५१ केंद्रावर दोन सत्रात परिक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात १५ हजार ८४८ परिक्षार्थीं पैकी ९ हजार ५०५ परिक्षार्थींनी परिक्षा दिली तर ६ हजार ३४३ गैरहजर राहिले. दुपारच्या सत्रात ९ हजार ४८३ विद्यार्थी हजर होते तर ६ हजार३६५ विद्यार्थी गैरहजर होते.
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा एकूण ५१ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १ हजार ६३८ अधिकारी - कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी परीक्षेसाठी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत परिक्षा पार पडली.
समन्वय अधिकारी- १३, भरारी पथक -२, उपकेंद्र प्रमुख-५१, सहायक-५१, पर्यवेक्षक-१६६, सहायक कर्मचारी -९७, समन्वय अधिकारी/भरारी पथक सहायक- १५, समवेक्षक-६६१, लिपीक -५१, केअर टेकर-५१, बेलमन-४५, शिपाई-२०२, पाणीवाटप कर्मचारी-१६६ आणि वाहनचालक ६७ यांनी परिक्षा सुरळितपणे पार पाडली.