शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सिद्धटेकला गणेशोत्सवाची तयारी

By admin | Published: August 26, 2014 11:20 PM

कुळधरण : अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

कुळधरण : अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यभरातून लाखो भाविक अष्टविनायकांचे दर्शनासाठी गर्दी करतात. भीमा नदीच्या किनारी वसलेल्या सिद्धटेकच्या विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रेलचेल असते. मंदिर व्यवस्थापनाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध महापूजेचे आयोजन करण्यात येते. सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीला भीमास्नान घालण्यात आले. मंगळवारपासून श्री सिद्धीविनायकाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चतुर्थीपर्यत हा सोहळा सुरू राहणार आहे. रोज सायंकाळी श्री ची पालखी नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात आणण्यात येते. पालखी उत्सवात ग्रामस्थ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पालखी सोहळ्यात ग्रामस्थ, बाळगोपाळ पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतात. यात रेवड्यांची उधळण केली जाते. ‘बाप्पा मोरया’च्या गजरात पालखी उत्सव सुरू असतो. रात्री मोरया गोसावीरचित पदांचे गायन होते.गणेशोत्सवादरम्यान सिद्धी विनायकाला प्रात:कालीन पूजेनंतर पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात येते. यावेळी श्रीगणेशाला नानाविध अलंकाराने सजविले जाते. हिरे-रत्नजडित सुवर्णालंकारांचा यामध्ये समावेश असतो. गणेश जन्माचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप होते. गावात सार्वजनिक गणपती बसविले जात नाहीत. (वार्ताहर) ग्रामपंचायतीच्या सुविधासिद्धटेकच्या विविध विकास कामांचा नियमित पाठपुरावा केला जातो. सध्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, अशा सुविधा ग्रामपंचायतीकडून पुरविल्या जात आहेत. गणेशोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.