नागपूर : अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत. शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास कारणभूत असून ते टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविले होत, असा गौप्यस्फोट करीत पाठविलेल्या पत्राचे वाचन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केले. यावर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत खडाजंगी उडाली. कोतकर व ठुबे यांच्या खून प्रकरणातील आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांची जामीनावर मुक्तता झाल्याने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या प्रकरणात अतिरिक्त चार्ज सिट दाखल करण्यात यावी, तसेच सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे अनील परब यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली. धनंजय मुुंडे म्हणाले, हा निदंनीय प्रकार आहे. पोलिसांवर शिवसेना नेत्यांचा कशाप्रकारे दबाव होता. या प्रकरणातील खरे आरोपी कोण आहेत. हे पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या प्रकरणात जावीपूर्वक खोटा गुन्हा दाखल करायला लावला. पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात अनिल राठोड यांनी यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख केला आहे. आमदार संग्राम जगताप यांना हकनाक गोवण्यात आल्याचा आरोप करून या पत्राची चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी उडाली. आरोप-प्रत्यारोप झाले. अनिल परब यांनी पत्र वाचण्यावर आक्षेप घेतला. गोंधळामुळे तालिका सभापती गिरीश व्यास यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले. कामाजाला सुरुवात झाल्यानंतर मुंडे यांनी पुन्हा पत्र वाचायला सुरुवात केली. यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांनी जो अहवाल पाठविला आहे. तो तपासून निश्चित कारवाई कण्याचे आश्वासन दिले.
केडगाव दुहेरी खून प्रकरणात पोलिसांवर शिवसेनेचे अनिल राठोड यांचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 6:47 PM
अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत.
ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी वाचून दाखविले पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना लिहिलेले पत्र