अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या कारवाईचे आदेश दिले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ज्यांच्यावर एक किंवा एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना निवडणुकीच्या काळात शहरातून, जिल्ह्यातून हद्दपार करावे किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव पोलिसांकडून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दाखल झाले होते. त्यात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, तसेच राजकीय पदाधिका-यांचा समावेश आहे. सुनील अंबादास तांबे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला सहा महिन्यासाठी, तर आश्पाक उर्फ बाबा निसार शेख (रा. चांदा, ता. नेवासा) व गोरख करांडे (रा. देहरे, ता. नगर) या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.कोतवाली १०६, नगर तालुका २४, तोफखाना ९२, एमआयडीसी ३८, तर भिंगार पोलीस ठाण्यातून १०१ अशा एकूण ३६१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम, विक्रम राठोड, विनीत पाऊलबुधे, स्वप्निल रोहिदास शिंदे, निखिल बाबासाहेब वारे, कुमार वाकळे, सचिन तुकाराम जाधव, चत्तर निसार शेख,स्वप्निल अशोक ढवण, निलेश भाकरे, दिगंबर गेंट्याल,अंकुश मोहिते, ओमकार भागानगरे, श्रीकांत छिंदम, संदीप जाधव, शेख मन्सूर शेख आसिफ शेख, शहानवाज सय्यद, तनवीर पठाण, वैभव वाघ, श्रीकांत मुर्तडक, राकेश वाडेकर, गोपाल मालवानी, रोहित फड, आदित्य गवळी, प्रमोद नेटके, संतोष सेंदर, प्रशांत सेंदर, वसीम शेख, रशीद सलमान शेख, मोहसीन खान सलमान, आरिफ खान, दीपक सचिन महाजन, अजिंक्य म्हस्के, शेख वसीम, रफिक शेख, रिजवान रशीद आदींसह ३६१ जणांचा त्यात समावेश आहे. १९ ते २४ आॅक्टोबरदरम्यान शहरात कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी, रोज सायंकाळी सहा वाजता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा काही अटी-शर्तींवर या सर्वांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
निवडणूक पार्श्वभूमीवर नगरमध्ये ३६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; तिघे हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:02 PM