शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

By अनिल लगड | Published: August 02, 2020 2:06 PM

कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा आणि खर्चाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. फक्त यासाठीच शेतक-यांना दुधाला दरवाढ हवी आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतक-यांना बसला आहे. कोरोनामुळे राज्यात ५२ लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. आंतरराष्टÑीय बाजारात दूध पावडरला मागणी नसल्याने राज्यात दूध पावडरचे साठे गोदामात पडून आहे. या पार्श्वभूमीवर दुधाचे दर कोसळले आहेत.

   दुधाला भाव नसल्याने शेतक-यांचे अर्थचक्र पूर्ण कोलमडून गेले आहे. सध्याचा दुधाचा भाव शेतक-यांना परवडणारा नाही. यामुळे शेतकरी संघटना, भाजप, माकप, भापकसह विविध संघटना दूध दरवाढीसाठी पुढे सरसावल्या आहेत. यामुळे दूध संघांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. 

दुधाला ३० रुपये प्रतीलिटर भाव द्यावा. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटरमागे १० लिटर अनुदान द्यावे. अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग करावे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचे धोरण तातडीने मागे घ्यावे. दूध पावडरसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती शेतकरी संघटना, रासप, रिपाइं, किसान सभा, मनसेतर्फे राज्यातील हजारो गावात शनिवारी (१ आॅगस्ट) पुन्हा आंदोलने झाली. परंतु शेतक-यांच्या दूध उत्पन्न खर्चाचा आणि सध्याच्या दुधाचा लिटरच्या भावाचा विचार केला तर खूप मोठी तफावत आहे. जर सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. अन् शेतकरी कर्जबाजारी झाला की तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो, हे ठरलेलेच आहे. तरी राज्य सरकारने तातडीने शेतक-याला दुधाला ३० ते ४० रुपये लिटर भाव देऊन त्याला दिलासा देण्याची गरज आहे. 

एका गायीपासून मिळणारे उत्पन्न असे...१५ ते २० लिटर दूध देणारी गाय खरेदी -४० ते ६० हजार रुपयांना खरेदी करावी लागते. गाय सरासरी १२० दिवस पूर्ण क्षमतेने १५ ते २० लिटर दूध देते. त्यानंतर पुन्हा १२० दिवस कमी जास्त प्रमाणात दूध देते. १६५ दिवस ती भाकड राहते. परंतु ती शेतक-याला वर्षभर सांभाळावी लागते. तिचा नेहमीचा खर्च मात्र करावाच लागतो. ही गाय सरासरी रोज १८ लिटर दूध देते असे धरले तर २४० दिवसांचे ४३२० लिटर दूध होते. त्याचा भाव सरासरी १८ रुपये धरला तर एकूण उत्पन्न ७७ हजार ७६० रुपये होतात. त्यात गायीच्या शेणाचा शेतकरी खत म्हणून वापर करतो. त्याचे उत् पन्न ५००० रुपये धरले तर एका गायीचे ८२ हजार ७६० असे एकूण उत्पन्न मिळते. 

एका गायीसाठी होणारा खर्च असा....शेतक-याला एका गायीपासून सरासरी ८२ हजार ७६० असे उत्पन्न मिळते असे आपण समजू. आता शेतक-यांच्या खर्चाचा विचार केला तर एका गायीस सरकी महिन्यास दोन पोते लागते. त्याचा भाव १३०० आहे. दोन पोत्याचे २६०० रुपये होतात. यात मका भरडा टाकावा लागतो. त्याचा खर्चही २८०० रुपये होतो. घास, गिणी गवत, कोरडा भुसा किंवा घासाच्या पेंढ्या रोज १०. घासाची पेंढी ७ रुपयाला मिळत नाही. तरी पेंढी सात रूपये धरली तर ७० रुपये होतात. यात कोरडा चारा, गवत सोडून दिले (शेतकरी बारीक विचार करीत नाही) तरी निव्वळ घासाचे ७० गुणीले महिन्याचे ३० दिवस केले तर २१०० रुपये होतात. असा दरमहा ७५०० रुपये खर्च होतो. दिवसाला २५० रुपये रोज खर्च शेतक-याला एका गायीमागे करावा लागतो. 

दहा हजारांचा तोटावर्षाचा ३६५ दिवसाचा खर्चाचा विचार केला एकूण खर्च ९१ हजार २५० रुपये होतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी खर्च धरला तर शेतक-याचा वर्षाला ८ ते १० हजार रुपयांचा तोटा होतो. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टरचा खर्च, घरातील गायीची सोडबांध करणे, धारा काढणे, वासरु पाजणे, धुणे आदी विविध कामे दिवसभर करावीे लागतात. त्याचा खर्च तर वेगळाच आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmilkदूधFarmer strikeशेतकरी संप