अहमदनगर : पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन व्हॅर्च्युअल सोहळ््यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निम्मे भाषण चक्क मराठीतूनच केले. त्यामुळे लाईव्ह ऐकणाºयांना हा सुखद धक्काच बसला.
छत्रपती शिवाजी महाराज, वीर-विरांगण, कर्मयोग्यांची भूमी महाराष्ट्र भूमीला वंदन करतो, असे सांगत त्यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्राच्या विकासाला त्यांनी कसे समर्पित केले. याबाबत आत्मचरित्रातील ओळी उद्धृत करताना ते म्हणाले, ‘मी स्वत: सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही. मात्र समाजासाठीच राजकारण व सत्ता हे पथ्य मी कायम संभाळले’. राजकारण करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यावर भर राहिला, असे मराठीतूनच त्यांनी सांगितले.
‘सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची, किंवा धर्माची भटीक नाही. आतापर्यंत सगळ््या समाजाला जातीनिहाय पद दिले आहे. सहकारी अभियान निष्पक्ष आहे. त्याचा जातीशी संबंध नाही. सहकारी चळवळ ही सर्व वर्गाच्या कल्याणाची आहेस असे त्यांनी लिहिले आहे, असे मोदी यांनी मराठीतूनच सांगितले.
देह वेचावा कारणी हे नाव प्रासंगिक आहे. संत तुकाराम महाराज यांच्याच या पंक्ती आहेत. त्यांच्या जीवनाचे याच अभंगात सार आहे, असे गौरवपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले.शेतीत कौशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही, असे विखेंच्या शब्दात त्यांनी सांगितले. आत्मचरित्रातील अनेक दाखले देत त्यांनी मराठीतूनच सांगितले.