शिवाजी पवार
श्रीरामपूर : सामान्यत: मार्चपासून उन्हाची तीव्रता आणि त्यामुळे दुधाचे दर वाढतात. यंदा मात्र आतापासूनच दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढले आहेत. नव्या वर्षात दूध, दही, ताक, श्रीखंड व इतर पदार्थांच्या दरात लीटरमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. ग्राहकांशी हुज्जत नको, म्हणून दुकान चालकांनी, विविध दूध संघांनी दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ केल्यासंबंधीची दरपत्रकेच दुकानांत चिकटविली आहेत.
दही, ताक, श्रीखंड, पनीर यांना रोज मोठी मागणी असते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दरात दोन ते तीन टक्के वाढ होत असते. यंदा जानेवारीतच दरवाढ झाली असून, मार्चनंतर त्यात आणखी वाढ होऊ शकेल.दरवाढीला निर्यातही कारणीभूतच्सध्या दूध पावडरच्या निर्यातीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे पावडर निर्मितीकडे उद्योजकांचा कल वाढला आहे. स्पर्धा वाढल्यामुळे डेअरी चालकांनीही ग्राहकांना दर वाढवून दिला. त्याचा दरवाढीवर परिणाम झाल्याचे उद्योजकांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्सध्या गायीच्या दुधाचा खरेदी दर ३४ ते ३५ रुपये आहे. म्हशीच्या दुधाला लीटरमागे ४० ते ४२ रुपये दर आहे. राज्य सरकारने दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ केली होती. शेतकऱ्यांना लीटरमागे पाच रुपये अनुदान दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे दर वाढवले गेले. लीटरमागे २७ रुपयांवर असणाºया या दरांत आता सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे.दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याने पदार्थांचे दर वाढले आहेत. उन्हाळ्यात दुधाची कमतरता भासते. त्यामुळे हे दर कमी होणार नाहीत. पुढील दरवाढीवर आताच बोलता येणार नाही.- किशोर निर्मळ, उद्योजक, प्रभात उद्योग समूहदुधाचे दर बराच काळ पडले होते. खरेदी दर वाढताच कंपन्यांनी पदार्थांचेही दर वाढवले. ग्राहकांना दिलासा देण्याची त्यांची तयारी नाही. दूध, दही, पनीर, श्रीखंड या पदार्थांबाबत ग्राहकांच्या आवडी ठरलेल्या आहेत. ग्राहकांंविषयी सकारात्मक भूमिका असायला हवी.- सिद्धार्थ मुरकुटे, दुग्ध व्यवसायातील तज्ज्ञ