राहाता : निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत निळवंडेबाबत समितीला माहिती होती. त्यांना बरोबर घेऊन साथ देत हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे मी निळवंडे कृती समितीचा कार्यकर्ता आहे, असे मत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले.राहाता तालुक्यातील अस्तगाव येथून मंगळवारी प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार लोखंडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. खडकेवाके, केलवड, कोºहाळे, डोºहाळे आदी गावांमध्ये जात खासदार लोखंडे यांनी मतदारांशी संवाद साधला. खासदार लोखंडे म्हणाले, आपण निळवंडेसारखा प्रश्न मार्गी लावला. देशातील २४ पैकी आठ कृषी प्रोड्यूसर कंपन्या मतदारसंघात आणल्या. साई खेमानंदसारखा कॉमन मेडिकल फॅसिलीटी सेंटरसारखा प्रकल्प मतदारसंघात उभा केला. स्वत:ला उच्चशिक्षित समजाणाºया मागील खासदारांचा शिल्लक निधीही खर्च केला. माझा २५ कोटी व मागील खासदारांचा १ कोटी ५५ लाख एवढा निधी शिर्डी लोकसभा मतदारसंघात खर्च करीत अनेक विकास कामे केली.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, भाजपा तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, तालुकाप्रमुख संजय शिंदे, संघटक विजय काळे, भाजपचे सरचिटणीस नितीन कापसे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन तांबे, कमलाकर कोते, निळवंडे कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, उत्तमराव घोरपडे आदी उपस्थित होते.
निळवंडे कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला :सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:15 AM