शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

घोंगडी निर्मितीचा व्यवसाय मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 4:52 PM

आधुनिकतेच्या काळात मऊ हलक्या अशा ब्लॅँकेट, रजईची मागणी वाढली. यामुळे वजनाला जड व थोडीशी अंगाला टोचणाऱ्या घोंगडीची मागणी अतिशय कमी झाली.

सुभाष आग्रेम्हैसगाव : आधुनिकतेच्या काळात मऊ हलक्या अशा ब्लॅँकेट, रजईची मागणी वाढली. यामुळे वजनाला जड व थोडीशी अंगाला टोचणाऱ्या घोंगडीची मागणी अतिशय कमी झाली. या कारणाने खांबे (ता. संगमनेर) या गावातील घोंगडी बनवण्याचा परंपरागत घरगुती व्यवसाय मोडकळीस आला आहे. एकेकाळी २० ते २२ विणकर असलेल्या संगमनेर तालुक्यातील खांबे गावात अवघे दोनच विणकर उरले आहेत.ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी मेंढपाळ घोंगडीचा वापर प्रामुख्याने केला जातो. यामुळे मेंढपाळ रानावनात फिरताना घोंगडी ही सदैव बरोबर बाळगतात म्हणून ही मेंढपाळांची ओळखच बनली आहे. तसेच घोंगडीने नैसर्गिकपणे अ‍ॅक्युपंक्चर होत असल्याने तिचे वैद्यकीय महत्त्व आहे. यामुळे व्याधी असणाºया रोग्यांना घोंगडी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तरीही हा घोंगडी विणकरांचा व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहे.पंचवीस-तीस वर्षांपूर्वी खांबे (ता. संगमनेर) या गावामध्ये घोंगडी खरेदी विक्रीसाठी बाजार भरला जात होता. त्यावेळी खांबे येथे घरोघरी घोंगडी तयार केली जात होती. घोंगडी ही माग या यंत्रावर बनवली जाते. त्यावेळी खांबे गावात दोनशे मागावर घोंगडी तयार केली जात होती. आता हा घोंगडी बनवण्याचा परंपरागत व्यवसाय मोडकळीस आला असून खांबे या गावात गंगाराम सखाराम जोरी, अहिलाजी सखाराम जोरी हे भाऊ व त्यांच्या भागिनी जानकाबाई सखाराम जोरी यांनी हा व्यवसाय आजच्या काळात जिवंत ठेवला आहे.घोंगडी बनवण्याचे काम हे वेळ खाऊ तसेच कष्टाचे व जिकरीचे आहे. यामुळे दुपारपर्यंत एकच घोंगडी तयार होते. घोंगडी तयार करण्यासाठी मेंढीची लोकर, चिचोंक्याची खळ यांचा वापर केला जातो. घोंगडी तयार करण्यासाठी रहाट, माग, घोडा तुराई, दातारी, लौकी, पाजणी या पारंपरिक अवजारांचा वापर केला जातो. लोकर पिंजून साफ करून ती पाण्यात ओली करुन रहाटावर लांब धाग्यासारखे बनवले जाते. नंतर मागावर उभे लोकरीचे धागे विणले जातात. त्या धाग्यांना पाजणीवर ‘कुची’च्या साह्याने चिंचोक्याची खळ लावली जाते. यामुळे घोंगडीला कडकपणा येतो. ती खळ वाळल्यानंतर पुन्हा मागावरती आडवे लोकरीचे धागे विणले जातात. अशा प्रकारे ४० इंच बाय ११२ इंच किंवा ४०इंच बाय ६ फुट आकाराची घोंगडी तयार होते. पावसाळ्यात घोंगडीला कोकणामध्ये मागणी असते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर