दीपक गांधले जिल्ह्यात प्रथम
अहमदनगर : एन.सी.व्ही.टी अॅप्रेंटिसशिप परीक्षेत अहमदनगरच्या डॉ. विखे पाटील आय.टी.आय.मधील पेंटर ट्रेडचा प्रशिक्षणार्थी दीपक गांधले हा अहमदनगर जिल्ह्यात प्रथम आला. त्यास ८४ टक्के गुण मिळाले. या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य आर. एस. क्षीरसागर, अॅप्रेंटिस सल्लागार यू. के. सूर्यवंशी, वर्गशिक्षक एस. ए. शेलार आदींनी त्याचा सत्कार केला. या यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा. डॉ. सुजय विखे, सेक्रेटरी जनरल लेफ्ट.जन. डॉ. बी. सदानंद, संचालक(तांत्रिक) डॉ. पी. एम. गायकवाड, उप-संचालक प्रा. सुनील कल्हापुरे आदींनी अभिनंदन केले.
-------------------
भारत स्वाभिमानचा वर्धापन दिन साजरा
अहमदनगर : योगगुरु रामदेव बाबा प्रणित भारत स्वाभिमान न्यासला २६ वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमास स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब निमसे, जिल्हा संघटन मंत्री मधुकर निकम, भारत स्वाभिमानीचे कोषाध्यक्ष अविनाश ठोकळ, पश्चिम महाराष्ट्र केंद्रीय सदस्य कल्पना ठोकळ, महामंत्री ज्योत्स्ना महाजन, योग शिक्षक बाळासाहेब जाधव, गायत्री कुलकर्णी, दत्ता इंगळे, उबाळे, वाघ, मनिषा लोखंडे, ज्योती शेटे, रूपाली काळे, ज्योती शिरसाठ, स्मिता फिरके, भारती निमसे आदी उपस्थित होते. अविनाश ठोकळ यांनी आभार मानले. पतंजली योग समितीच्या योगशिक्षकांनी कोरोना संकट काळात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा स्नेहालय परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला.