शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 4:26 PM

कोपरगाव : तत्कालिन माजी आमदार अशोक काळे यांनी तालुक्यातील कोळगाव थडी व उक्कडगाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सरकारकडे सादर ...

कोपरगाव : तत्कालिन माजी आमदार अशोक काळे यांनी तालुक्यातील कोळगाव थडी व उक्कडगाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सरकारकडे सादर करून पाठपुरावा केला. पण या योजनेचे भूमिपूजन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.कोळगाव थडी व उक्कडगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून काळे यांनी मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत प्रस्ताव दाखल केले होते. कोळगावच्या योजनेस कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिले. त्यानंतर दोन्ही प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली. योजनेचे भूमिपूजन साध्या पध्दतीने करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. परंतु कोल्हे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता परस्पर भूमिपूजन केल्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत कोळगाव थडीचे उपसरपंच अप्पासाहेब जाधव, ग्रामपंचायतसदस्य, राजेंद्र गवळी, विठ्ठल जगताप, भास्कर मेहेरखांब, भिकन निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, कैलास लुटे, विलास निंबाळकर, नंदकिशोर निंबाळकर, भाऊसाहेब लुटे, दिनकर वाकचौरे, अ‍ॅड. शफिक शेख, गणेश निंबाळकर, सचिन काळे, अप्पासाहेब काळे, वाळिबा निंबाळकर, सोपान शेवाळे यांनी कोल्हे यांना काळे झेंडे दाखवित निषेध नोंदविला.

माजी आमदार अशोक काळे यांच्यामुळे कोळगाव थडीच्या महिलांचा डोक्यावरील हंडा उतरून पाण्याची वणवण कायमची थांबणार आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी योजनेचे साध्या पध्दतीने भूमिपूजन करण्यास संगितले होते. परंतु आयत्या पिठावर रेघा मारणा-या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हाला विश्वासात न घेता केवळ श्रेय लाटण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ‘लोकांची कढी, धाऊ धाऊ वाढी’, असा प्रकार आहे.-शामल लुटे, सरपंच.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव