जामखेड : निसर्ग हा महाबलवान असून सृष्टीच माणसाला जगविते. माणसे अविचाराने झाडांची कत्तल करून वारंवारच्या दुष्काळाचे संकट ओढवून घेतात. गावच्या बळकटीसाठी, शिवाराच्या समृद्धीसाठी वनराईचे रक्षण करा, असे आवाहन प्रसिद्ध लेखक प्रा. आ. य. पवार यांनी केले.
बावी (ता. जामखेड) येथे ग्रामपंचायत कार्यालय व पर्यावरण समितीच्या वतीने मारूती मंदिरासमोर ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू झाले. यावेळी ते बोलत होते. गावच्या वनराईच्या रक्षणाची शपथ ग्रामस्थांनी घेतली. यावेळी सदाशिव पवार, लियाकत सय्यद, चतुर्भुज मुरुमकर, दत्ता पवार, दादा मंडलिक, इमाम पठाण, महादेव शिंदे, रामदास पवार, अशोक शिंदे, संतोष पवार, आशाबाई निकम, इन्नुस सय्यद, देवकर गुरुजी आदी उपस्थित होते. ग्रामसेवक फरताडे यांनी आभार मानले. यावेळी मास्क वाटप करण्यात आले.