भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते राम जाजू, उत्तर नगर जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, सरचिटणीस भारत गवळी, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष संपत गलांडे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, नगरसेविका मेघा भगत, संपत गलांडे, ॲड. गोरक्ष कापकर, बालाजी लालपोतू, वाल्मीक शिंदे, डॉ. महेंद्र कोल्हे, संजय भालेराव, जगन्नाथ शिंदे, अमित गुप्ता, कल्पेश पोगूल, सोमनाथ परदेशी, प्रशांत परदेशी, राहुल भोईर, विकास गुळवे, आरती पठाडे, योगराजसिंग परदेशी, दिलीप रावल, दीपेश ताटकर आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने ७ मे २०२१ रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणण्याचे आदेश काढले. यात मागासवर्गीय प्रवर्गासाठी पदोन्नतीमध्ये राखीव ठेवलेली पदे रिक्त न ठेवता ही सर्व पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे नमूद केले आहे. यामुळे मागासवर्गीय तथा ओबीसी समाजघटकांवर मोठा अन्याय झाला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झालेला नाही. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता ओबीसी समाजघटकांची जनगणना करावी, तसेच त्याबाबतची माहिती उपलब्ध करून द्यावी. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न न केल्याचे निर्देशनास आल्यास ओबीसी समाज भविष्यात उग्र आंदोलन करेल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सोडून दिल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी सांगितले.
फोटो नेम : २६भाजप आंदोलन, संगमनेर,
ओळ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने संगमनेर बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.