अहमदनगर- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पंधरा दिवसात दहा ते बारा रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली.
आयटकचे पदाधिकारी सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सेक्रेटरी सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, शंकर न्यालपेल्ली आदींनी या दरवाढीचा तीव्र निषेध केला. कोरोनामुळे सामान्यांचे जीवन आधीच मेटाकुटीला आलेले असताना त्यात ही दरवाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नसताना पेट्रोल व डिझेलमध्ये दरवाढ केली जात आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. सरकारने तातडीने ही दरवाढ रोखावी, अशी मागणी यावेळी केली.फिजिकल डिस्टन्सिंग पाळत पदाधिकाºयांनी सरकारचा निषेध केला.