अहमदनगर: नगर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक स्वायत्त संस्था आहे. तिलाही स्वतःचे काही अधिकार आहे, समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कांदा मार्केटचे स्थलांतर झाल्यानंतर ही जागा रिकामी पडली होती. समितीने नियमानुसार पूर्वीचे कांदा शेड जागेवर पत्र्याचे शेड उभारून व्यापाऱ्यांना करारानुसार गाळे दिले. शिवेसनेचे काही पदाधिकारी मात्र, समितीतील गाळे पाडण्यासाठी प्रयत्न करून व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत व्यापाऱ्यांनी शुक्रवार समिती नेत्यांच्या नावाचे फलक झळकावून निषेध आंदोलन केले.
बाजार समितीतील अनधिकृत व्यापारी गाळे पाडण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाने आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा पाठपुरा करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी निषेध करत व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणू नये, जे राजकारण करायचे आहे ते राजकीय पातळीवर करा मात्र, व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नये, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. वेळ पडल्यास सर्व व्यापारी व्यवसाय बंद करून सामुहीक आत्मदहन करतील, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला. या आंदोलनात राजेंद्र चोपडा, विशाल पवार, राजेंद्र बोथरा, नितीन शिंगवी, बबलू नवलानी, धनेश कोठारी, विजय मुनोत, बाळासाहेब दरेकर, रमेश इनामकर, भरत पवार, गणेश कोठारी, प्रसाद बोरा, निनाद औटी, मनोज राका, प्रीतम नवलानी, राहुल सोनीमंडलेचा, सुरेश कर्पे, अभय लूनिया, महवीर छाजेड, मनीषा दर्डा, विशाल दाभाडे, दिनेश सोनी मंडलेचा, बाळासाहेब पवार आदी सहभागी झाले होते.