अकोले- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्त्वाखाली अकोलेत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकरांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी आमदार लहामटे म्हणाले, शरद पवार हे बहुजन समाज्याचे नेते असुन त्यांच्यावर टीका करणारांची गय केली जाणार नाही. वैयक्तिक द्वेषापोटी शरद पवार यांचेवर टीका करणे योग्य नाही. टीका-टिप्पणी ही राजकीय मुद्द्यावर असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, माञ पवार साहेब यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर केलेली टीका सहन केली जाणार नाही.
जाती-धर्मात सलोखा निर्माण करण्याचे काम ते करतात. पवार यांना मानणारा वर्ग प्रत्येक जाती धर्मात आहे. माञ धनगर जातीच्या मतावर डोळा ठेऊन भाजपाने आमदार म्हणुन त्यांना विधानसभेची आमदारकी दिली आहे. ज्यांना स्वत: विचारधारा नाही. त्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर बोलावे हा अतिशय निंदनिय प्रकार आहे. वंचितमध्ये असलेल्या पडळकर यांना अचानकपणे भाजपाने प्रवेश देऊन आपली प्रतिमा आणखी मलिन केली आहे.
त्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर फिरु देणार नाहीत. गोपिचंद पडळकर यांनी लवकर माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकपणे याचे उत्तर देतील. अमित भांगरे यांनीही पडळकर यांच्या बेताल व्यक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला.यावेळी अमित भांगरे, रवी मालुंजकर,अमित नाईकवाडी, स्वाती नाईकवाडी, सुभद्रा नाईकवाडी, महेश तिकांडे, राजेंद्र कुमकर, सुरेश गडाख, संदिप भाऊसाहेब शेणकर, संतोष नाईकवाडी, अय्याज पठाण, आनंद देशमुख, दत्ता धुमाळ, राज वाकचौरे, निखिल नवले, अभिजित देशमुख, सचिन पवार आदि उपस्थित होते