नेवासा : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतच्या भारत बंद निमित्त नेवासा तालुका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे बन्सी सातपुते यांनी केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहेत. त्याचे भविष्यात शेतकऱ्यांवर दुष्परिणाम होतील. शेतीचे भांडवलीकरण मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला.
कॉम्रेड बाबा अरगडे यांनी यापुढे हा लढा अधिक तीव्र करून शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीने लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केंद्र सरकारने आणलेले अन्यायी कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली.
यावेळी आप्पासाहेब वाबळे, बापूसाहेब आढगले, दत्तात्रय गोंधळी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, सतीश तऱ्हाळ, आकाश धनवटे, सौरभ कासावणे, तन्वीर शेख, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी निवेदन स्वीकारले.
---
२७ नेवासा आंदोलन
नेवासा येथे भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.