श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी यावेळी निदर्शने करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे भाजपने हे आंदोलन केले.
राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे काम हे ठाकरे सरकारमधील मंत्री करीत आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, गणेश राठी, विठ्ठल राऊत, संतोष हरगुडे, महेश खरात, दत्ता जाधव, अशोक लोंढे, रूपेश हरकल, अक्षय नागरे उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. भारतीय जनता पक्षाच्या वतीने यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी योगेश राऊत, बंडूकुमार शिंदे, विशाल अंभोरे, विजय आखाडे, डॉ.ललित सावज, दीपक मिसाळ, मनोज ओझा, रवी पंडित, पंकज करमासे, बापूसाहेब पवार, संपत राऊत, दत्तात्रय देवकाते, अजित बाबेल आदी उपस्थित होते.