टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कब्रस्तान सुशोभिकरणासाठी २५ लाखांचा निधी दिला. भारत देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व गरजेचे असून राज्यघटनेने प्रत्येकाला जगण्याचे अधिकार दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यापुढील काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान सुशोभिकरणास आमदार लंके यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेकडून टाकळी ढोकेश्वर येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी हा निधी दिला असून भविष्यात गरज पडली, तर अजून निधी देण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी या मुस्लिम बांधवांना दिले.
टाकळी ढोकेश्वर येथे सुफी संत ईस्माईलशाह मजीदी यांच्या प्रथम उरूसाच्या निमित्त उपस्थित राहून आमदार निलेश लंके यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी सुफी रफिकमियाँ सुफी, वलिमियाँ सुफी, शफिकमियाँ सुफी अजीजमियाँ, राजुशेठ शेख, तसेच बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, बाळासाहेब खिलारी, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, राजेंद्र चौधरी, बापू शिर्के, किरण तराळ, भागूजी झावरे, पियुष गाजरे, प्रकाश गाजरे, सोमनाथ आहेर, रामा तराळ, अशपाक हवालदार, दत्ता निवडुंगे, अभय नांगरे, जालिंदर वाबळे, अमोल उगले, शुभम गोरडे, राजू शेख, सद्दाम इनामदार, डॉ. उदय बर्वे, डॉ. बाबासाहेब गंगाड, दीपक मुळे, सुनील टोपले आदी उपस्थित होते.
...........
१५ निलेश लंके
टाकळी ढोकेश्वर येथील कब्रस्तानचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार निलेश लंके, अशोक कटारिया, अरुणा खिलारी, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.