गोदावरी खोरे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या स्मृतिस्थळावरील प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गावपातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था, सेंटर व दूध उत्पादकांना वाटप करावयाच्या कर्जाचे अहमदनगर येथील स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक विनोद कुमार व कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक आर. एस. संधानशिव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मागील सभेच्या अहवालाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी वाचन केले, तर अहवालातील सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होऊन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.
परजणे म्हणाले, शेतकऱ्यांना दूध धंदा परवडेल हा दृष्टिकोन समोर ठेवून संघाने २०१६पासून अमेरिकेतून आयात केलेल्या सुधारित सॉर्टेड सिमेनचा उपक्रम कार्यक्षेत्रात सुरू केला. ९५ टक्क्यांहून अधिक कालवडींचा जन्मदर राहिलेला असून, आतापर्यंत एक हजार ६१० कालवडी जन्माला आलेल्या आहेत. त्यापैकी २२३ कालवडी पहिल्या वेतात आल्या आहेत. त्यांची दूध देण्याची सरासरी प्रतिदिन २६ ते २८ लिटर्स इतकी आहे. सॉर्टेड सिमेन केवळ ४०० रुपये दराने उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता आला. याशिवाय कोरोना महामारीत मयत झालेल्या संघाच्या दूध पुरवठादारांच्या अनाथ पाल्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण श्री नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेमार्फत करण्याचा महत्त्ववपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या सभेला ज्येष्ठ संचालक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर, माजी संचालक नानासाहेब सिनगर, भागवतराव धनवटे, जयराम पाचोरे, विद्यमान संचालक विवेक परजणे, उत्तमराव माने, निवृत्ती नवले, यशवंतराव गव्हाणे, भाऊसाहेब कदम, भिकाजी थोरात, गोपीनाथ केदार, सदाशिव कार्ले, दिलीप तिरमखे, सुनंदा होन, कुंदा डांगे यांच्यासह दूध उत्पादक सभासद, शेतकरी उपस्थित होते. संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले.
..............
फोटोओळी
गोदावरी संघाच्या सभेत बँकेचे विनोद कुमार, अध्यक्ष राजेश परजणे.
...........
फोटो१०: गोदावरी दूध संघ सर्व साधारण सभा - कोपरगाव
100921\img_20210909_202220.jpg
फोटो१०: गोदावरी दुध संघ सर्व साधारण सभा - कोपरगाव