जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी शेळके यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ असतो. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाळ्यात शेततळ्याची दुरुस्ती करताना आर्थिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेततळ्यातील कागदासाठी अल्पव्याज दरात कर्ज मिळावे, रांजणगाव मशीद येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे आधुनिकीकरण करावे, ग्रामीण भागात बँकेने एटीएम सुविधा सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी सरपंच काका देशमुख, राहुल शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ओळी
शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अल्पव्याजदराने कर्ज मिळावे, ग्रामीण भागात एटीएम सुविधा द्याव्यात या मागण्यांचे निवेदन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांना देताना राहुल शिंदे व शेतकरी प्रतिनिधी.