संगमनेर : लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे. लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात महाराष्ट्रातील आघाडीचे गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार धीरज देशमुख बोलत होते. लहानपणापासून मला एक खंत असायची. बाबा मला वेळ देऊ शकत नव्हते. मात्र त्यांचे कुटुंब किती मोठे होते हे आता मला समजले. शेतकºयांना चिंतामुक्त करणार आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते प्रयत्न करणार आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर माझे वडील विलासराव देशमुख यांचा मोठा विश्वास होता. कोणते खाते द्यायचे हे विलासराव यांनी फोन करून बाळासाहेब थोरात यांना विचारले होते.विधानसभेत आउटस्टँडींग स्टुंडड आहे. त्याला स्टँडींग कसे करायचे सर्वांनी हे ठरविले. लोकांनी अपेक्षा आहे. ही संधी आहे. संधीचे सोने करा. महाविकास आघाडीत जा. ही मैत्री कायम जपा. ही दोस्ती तुटायची नाही, असे आम्ही युवा पिढीने ठरविले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते-धीरज देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:28 PM