श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ शिवारातील पारगाव फाटा येथील खासगी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज, मंगळवारपासून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, मका, आदी भुसारासह कडधान्य खरेदी विक्रीचा प्रारंक करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष विठ्ठल वाडगे यांनी दिली.
वाडगे म्हणाले, अलीकडे श्रीगोंदा तालुक्यात कांदा, लिंबू, टोमॅटोचे क्षेत्र वाढले. मात्र, विक्री व्यवस्थेअभावी शेतकरी नाराज होता. सव्वा वर्षापूर्वी पारगाव फाटा येथे चैतन्य कृषी बाजार समिती सुरू केली.
कांदा, टोमॅटो उत्पादकांनी प्रतिसाद दिला. आता लिंबू बाजार दररोज भरत आहे. वरील पिके, फळांबरोबरच भुसार, कडधान्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला जास्त भाव मिळावा या हेतूने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज शेतकऱ्यांनी भुसार कडधान्ये आणावीत. ही खरेदी यापुढे सोमवार, गुरुवार आणि शनिवारी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.