अहमदनगर : श्रीराम विद्यालयाने राबविलेले गुणवत्तापूर्ण उपक्रम, १४ वेळा दहावीचा शंभर टक्के निकाल, घडविलेले राष्ट्रीय प्रावीण्यप्राप्त खेळाडू, तसेच संस्थेच्या महत्त्वाकांक्षी अशा ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील मिळालेले यश हे कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्नांचे यश असून संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालय संस्थेत सर्वोत्कृष्ट ठरले असल्याचे मत संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी व्यक्त केले.
ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेल्या व शिष्यवृत्तिधारक विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे, मुख्याध्यापक रावसाहेब साबळे व विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत दरवर्षी ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. संस्था शाखा व इतर संस्थेतील सहावी ते आठवीचे ८ हजार ४४४ विद्यार्थी या जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले होते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण येथील सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब साबळे, विजय जाधव, बाळासाहेब पिंपळे, राजेंद्र कोतकर, राजश्री जाधव, संजय भापकर, सुजय झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हास्तर गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीमधील गौरी गोडसे, संस्कृती हराळ या ३०० पैकी २९४ गुण मिळवत द्वितीय क्रमांकाची संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. भिवराबाई हरिभाऊ दरे शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत विद्या गायकवाड, प्रेरणा खिलारी, सोहम भापकर, छाया देवकाते व सातवीमधील भक्ती कुलांगे हे रोख पारितोषिक व सन्मानपत्राचे मानकरी ठरले. तसेच दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, संस्थेचे सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे, खजिनदार डाॅ. विवेक भापकर, गावचे उपसरपंच सुधीर पाटील भापकर, सरपंच नीलेश साळवे, अध्यक्ष रवींद्र पिंपळे, सुभाष डावखरे, शरद कोतकर, सुरेशराव बोठे, हरिभाऊ दरेकर, दासा गुंड, अरविंद कुमावत, रामदास साबळे, रोहिदास कुलांगे, बाळासाहेब कुताळ, विशाल शेलार, संतोष जाधव व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
-----------
फोटो : ०८श्रीराम विद्यालय
सचिव जी. डी. खानदेशे, विश्वस्त मुकेश मुळे यांच्यासमवेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षक.