राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज सायंकाळी सहा वाजता पिण्यासाठी ३५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले़ २६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज सायंकाळी २४९५५ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली असून पाण्याची पातळी १८१०़२० फूट इतकी झाली आहे़सोनईसाठी पिण्यासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून ते उद्या दुपारी साडेबारा वाजता बंद करण्यात येईल, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र कांबळे यांनी दिली़ गेल्या सहा दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे पाण्याची आवक ९३५ क्युसेकसवरून ६२५ क्युसेकसवर खाली घसरली आहे़मुळा धरणात ९५ टक्के पाण्याचा साठा झाला असून उद्या सकाळी पाणीसाठा २५००० दशलक्ष घनफूट पोहचणार आहे़ ३० सप्टेबरपर्यंत धरणात २५ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाल्यानंतर पुन्हा मुळा नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे़ नवरात्र उत्सवाच्या काळात पाणलोट क्षेत्रावर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे़ मुळा धरणाची वाटचाल भरण्याच्या दिशेने सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)
‘मुळा ९५ टक्के’
By admin | Published: September 16, 2014 1:06 AM