मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात खाली ३३०० हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली. रब्बीच्या पहिल्या आवर्तनामुळे गहू, हरभरा, ऊस, घास, कांदा, फळबाग या पिकांना दिलासा मिळणार आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा कोणताही आदेश आल्या नसल्याची माहिती मुळा धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे. उजव्या कालव्या खाली तीस हजार हेक्टर क्षेत्र आहे. उजवा कालवा सुटल्यानंतर गहू, हरभरा, कांदा, घास, फळबाग या पिकाला लाभ होणार आहे.
फोटो १५मुळा
कॅप्शन-
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आज सकाळी शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.