लोणी : शाळेच्या पहिल्याच दिवशी राहाता तालुक्यातील कुठेही शाळेची घंटी वाजली नाही, पण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने रथावरील भोंग्याने बांग देत मात्र जनतेची व पालकांची जनजागृती सुरू केली.
राहाता तालुका पंचायत समिती प्रशासकीय विभागाच्या वतीने जनजागृती रथ संकल्पना अंमलात आणली असून पुढील सात दिवस ही जनजागृती सुरू राहणार आहे. सध्याच्या काळातील उत्तम संस्कार हेच त्याचे बीज असणार आहे, हे लक्षात घेत हा रथ पुढील आठ दिवस तालुकाभर फिरून जनजागृती करणार आहेत. मुलांचा कोविड संसर्गापासून बढावा बचावासाठी रंगीत मास्क वापरणे, स्क्रीन टाईम कमी करणे, नकारात्मक बातमी मुलांपर्यंत न पोहोचवणे, ऑनलाइन शाळा उपक्रमात पालकाचंही सहभाग घेणे, घरगुती कामात मुलांना सहभागी करून घेणे, आदी काम या जनजागृतीतून करण्यात येणार असून, कोरोनाचे कारण दाखवून अनेक पालक विद्यार्थांना शाळा प्रवेशापासून वंचित ठेवतात, अशा पालकांचे प्रबोधन करणे, शाळा प्रवेशासाठी त्वरित आग्रह धरणे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घ्यावा याबरोबरच ऑनलाइन शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके, विनाशुल्क प्रवेश, विशेष गरजाधिष्ठित मुलांसाठी शस्रक्रिया, उपकरणाचे वाटप, पोषण आहार वितरण याबाबतचे प्रबोधन या जनजागृती रथाद्वारे होणार आहे, महिला लसीकरण जागृती वाढवणे आणि ६ ते १४ वर्ष वयोगटाचे मुले हक्काने शाळेत दाखल करणे हे उद्दिष्ट यामध्ये आहे.
सात दिवस आमचा निर्धार राहाता तालुका जनजागृतीचा हे घोषवाक्य घेऊन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा हा रथ वाड्यावस्त्यावर जाणार आहे.
..................
स्थलांतरित मुलांना वर्षभरात कधीही प्रवेश घेता येतो. शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा. यामुळे १०० टक्के शाळाप्रवेश होतील, अशी संकल्पना या जनजागृती रथामागे आहे.
-पोपटराव काळे, गटशिक्षण अधिकारी, राहाता
..........
जनजागृती रथ संपूर्ण राहाता तालुक्यात फिरणार असल्याने व माईकमधून शाळा प्रवेशासाठी सुंदर गीते, छान छान कविता, आणि संपूर्ण जनजागृतीसाठी रथ फिरणार असल्याने वाडीवस्तीवरील मुलांचे व पालकांचेही प्रबोधन होणार असल्याने निश्चित फायदा होईल.
- सतीश मुन्तोडे, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा वाकडी, ता.राहाता.
150621\1201img-20210615-wa0242.jpg
?? ???????? ??? ???? ?????? ????? ??????? ???????? ?. ????????? ???? ????? ????? ? ???? ?????? ?????????? ??????? ??????? ????? ????, ?????? ??.?.????? ????????? ??????? ????. ????????? ????????? ?????, ??. ?. ???? ???? ???????? ??.????????? ????, ???????? ??.????? ???? ?????, ?????? ??????? ??????? ?????????? ??????? ??????? ????.