शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

दुर्मिळ औषधी वनस्पतींचे राहुरीत संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:50 AM

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत  येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 

संडे अँकर/भाऊसाहेब येवले । राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत  येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन व्हावे व शेतक-यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ६६० वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे़ महाराष्ट्रात येणारे पर्यटक अवर्जून प्रकल्पाला भेटी देऊन दुर्मिळ वनस्पतींची माहिती जाणून घेतात. राज्यात अभावाने आढळतात. अशा काही दुर्मिळ वनस्पती विद्यापीठाने जतन करून ठेवल्या आहेत.  विषारी प्राण्याने दंश केल्यास प्राथमिक उपचार म्हणून वापरली जाणारी अंकोळ औषधी वनस्पतीचे संवर्धन केले आहे़. अंकोळचा लेप लावला की ते विष ओढून घेते. पांढ-या डागावरही ही वनस्पती उपयुक्त आहे. पोट विकारासाठी गोरख चिंच तर भद्राक्ष ही वनस्पती मुळव्याधीवर उपयुक्त आहे. जखमेवर अर्जुन साताडा, कॅन्सरवर लक्ष्मण फळ, पोटाच्या व्याधीसाठी ब्रम्हानंद उपलब्ध आहे. भिका-याचे वाडगे अर्थात कलाबक्ष ही वनस्पतीही उपलब्ध आहे. कलाबक्षाच्या फळात साठविलेले पाणी पिल्यास पोटाचे विकार बरे होतात. पूर्वीच्याकाळी भिक्षेकरी कलाबक्षाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत. साधूही कलाबक्षाचा वापर पाण्याची भांडे म्हणून करतात.औषधी प्रकल्पात दहा प्रकारच्या तुळशी आहेत. ५० एकरावर साकारलेल्या प्रकल्पात नक्षत्र गार्डन आहे. राशीनुसार वनस्पतींची लागवड केली जाते. संजीवनी वाटीकामध्ये उंच व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. सुगंधी वनस्पतींपासून अर्क काढला जातो. निलगिरीपासून काढलेला अर्क सर्दी, पडसे व डोके दुखी, सांधे दुखीसाठी  थांबण्यासाठी उपयुक्त आहे. जावा सेट्रोनीला या वनस्पतीपासून काढलेल्या अर्कचा उपयोग डास पळविण्यासाठी केला जातो. याशिवाय फ्रेशनर म्हणूनही या अर्काचा होतो. सुगंधी व औषधी प्रकल्पामध्ये आवळा, शतावरी, मेहंदी, शिकेकाई आदींचे चुर्ण तयार केले जातात. विद्यापीठाला भेटी देण्यासाठी आलेले शेतकरी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाला अवर्जून भेटी देतात. सोबत वनस्पती, बियाणे व बनविले अर्क सोबत घेऊन जातात. विभागप्रमुख म्हणून अशोक जाधव, इनचार्ज प्रसन्न सुराणा, सहाय्यक गणेश धोंडे, विक्रम जांभळे कार्यरत आहेत.

औषधी व सुगंधी प्रकल्पाला राज्यातून व्हिजिटर येतात़ मध्य प्रदेश व उत्तरप्रदेशातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. परदेशी पाहुणेही प्रकल्पाला भेट देऊन पहाणी करतात. वनस्पती जतन करण्याबरोबरच मार्गदर्शन केले जाते. वर्षातून एकदा औषधी वनस्पतीसंदर्भात प्रशिक्षणही दिले जाते. वनस्पतीचे रोपेही विक्रीस उपलब्ध आहेत़, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख गणेश धोंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीuniversityविद्यापीठ