अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार राहुल जगताप, वैभव पिचड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांकडून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बँकेसाठी थोरात, विखे, कोल्हे, गडाख, कर्डिले गटासाठी अर्ज नेण्यात आले आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम कोंडाजी गायकर यांनी तीन, जामखेड तालुक्यातून जगन्नाथ देवराम राळेभात यांनी दोन, कर्जत तालुक्यातून अंबादास शंकरराव पिसाळ यांनी दोन, पारनेरमधून दत्तात्रय मारुती पानसरे, संगमनेर तालुक्यातून दिलीप काशीनाथ वर्पे, रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संगमनेर तालुक्यातून माधवराव कानवडे यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातून करण जयंत ससाणे यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत. शेतीपूरक संस्थेतून माजी आमदार वैभव पिचड, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, सुभाष भीमाशंकर गुंजाळ यांनी अर्ज दाखल केले आहेत. बिगर शेती मतदारसंघातून प्रशांत सबाजी गायकवार व भगवानराव नारायणराव पाचपुते यांनी अर्ज भरले आहेत. महिला राखीवमधून संगीता जयंत वाघ, मीनाक्षी सुरेश पठारे, लताबाई जनार्धन वांढेकर यांनी अर्ज भरले आहेत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून माजी आमदार पिचड यांनी दोन अर्ज भरले आहेत. इतर मागासवर्गीय सदस्य पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, करण ससाणे यांनीही अर्ज भरले आहेत. याशिवाय ३७ जणांनी १४४ अर्ज नेले आहेत.
..
अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस
जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसाची मुदत आहे. गुरुवारी तिसरा दिवस होता. शुक्रवार व सोमवार असे दोन दिवस राहिले आहेत. शनिवार व रविवारी सुटी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस राहिले आहेत.
...
विकास विकास संस्थेसाठी घेतले सर्वाधिक अर्ज
अकोले-२०, जामखेड-१५, कर्जत-३१, कोपरगाव-२५, नगर-३६, नेवासा-२०, पारनेर-५९, पाथर्डी-२०, राहाता-११, राहुरी-४९, संगमनेर-३६, शेवगाव-४, श्रीगोंदा-४४, श्रीरामपूर-२७.
....
सूचना फोटो आहे.