राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत असलेल्या पोस्ट कार्यालयाने इमारत भाडे न दिल्यामुळे बाजार समितीकडून सोमवारी हे कार्यालय सील ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, एक महिन्याची मुदत वाढवून घेत पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी सील ठोकण्याची कार्यवाही लांबविली़ मात्र, या कारवाईमुळे सोमवारी दिवसभर पोस्ट कार्यालयाचे कामकाज बंद झाले आहे़कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोस्टाचे कार्यालय आहे़ या इमारतीचे भाडे १९९० पोस्ट कार्यालयाने भरलेच नाही़ १९९० साली भाडेदर सुधारीत करण्यात आला आहे़ तेंव्हापासून आजपर्यंत पोस्ट कार्यालयाकडे बाजार समितीची सुमारे १३ लाख २२ हजार रुपये थकले आहेत़ ही थकीत रक्कम वसुल करण्यासाठी पोस्ट कार्यालयाला वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ मात्र, या नोटिसांना केराची टोपली मिळाल्यामुळे सोमवारी बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे, सहायक मधुकर कोलते, निरीक्षक पांडुरंग सोळुंके, आॅडिटर एम़ आऱ शेख हे पोस्ट कार्यालय सील करण्यासाठी गेले होते़ मात्र, श्रीरामपूर पोस्ट विभागाचे अधिकारी उमेश धनवाडे, जी़ पी़ दातार यांनी राहुरी येथील पोस्टात येऊन भाडे भरण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली़ त्यामुळे सील ठोकण्याची कारवाई जरी चुकली असली तरी सोमवारी दिवसभर कार्यालयीन कामकाज बंद पडले़
राहुरीचे पोस्ट कार्यालय बंद
By admin | Published: July 03, 2017 3:15 PM