राहुरी : येथील एका हॉटेलवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकून दोन जणांसह हाॅटेल चालकाला ताब्यात घेतले आहे. तीन महिलांची सुटका केली.
राहुरी तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. राहुरी बसस्थानक परिसरात काही महिला राजरोसपणे वेश्या व्यवसायासाठी बसत होत्या. त्या ठिकाणी गिऱ्हाईकाचा शोध घेऊन एका हाॅटेलवर गिऱ्हाईकाला घेऊन जात होत्या. अनेक महिन्यांपासून व्यवसाय सुरू होता.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, हवालदार लक्ष्मण बोडखे, पोलिस नाईक संजय जाधव, पी. सी. थोरात व महिला पोलिस कर्मचारी राधिका कोहकडे यांनी राहुरी बसस्थानकासमोर असलेल्या हाॅटेल ऐश्वर्या येथे छापा टाकला. यावेळी दोन पुरूषांना आणि हाॅटेल चालकाला ताब्यात घेतले. तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली.