सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव (जि. अहमदनगर) : सर्व प्रवासी गाड्यांना पुणतांबा रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, आरक्षण खिडकी, तिकीट खिडकी सुरू करावी आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कोपरगाव, कान्हेगाव, श्रीरामपूर येथे रेल्वे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
कोपरगाव पासून जवळच असलेल्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर ग्रामस्थांनी गुरूवारी सकाळी दहा वाजता रेल्वे रोको आंदोलन केले. सर्व प्रवासी गाड्यांना पुणतांबा रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, आरक्षण खिडकी, तिकीट खिडकी सुरू करावी, रेल्वे प्रशासन कर्मचारी अरेरावी करतात त्यांना चाप बसावा, तसेच कोविड नंतर ज्या रेल्वे बंद केल्या त्या सुरू कराव्यात या प्रमुख मागण्या ग्रामस्थांच्या आहे. पुणतांबा येथे सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. यात पुणतांबा ग्रामस्थ बरोबर पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रेल्वे रुळावर सर्वांनी बैठक मारली. या रेल रोको आंदोलनात बंदोबस्तासाठी रेल्वे पोलीस फोर्स तसेच महाराष्ट्र पोलीस असे मिळून एकूण शंभर कर्मचारी तैणात होते. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत. दुपारी बारावाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.वं
दे भारत रेल्वे एक तास पासून मागच्या कोन्हेगाव स्टेशन वर उभी असल्याची आहे.