अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे. पहाटेही जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.कालपासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्याची काही भागात काल सायंकाळी जोेरदार पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा, राहुरी, नगर तालुक्यातील काही भाग, राशीन, संगमनेर, अकोलेसह इतर तालुक्यातही जोराचा पाऊस झाला. नगर शहरात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वा-यासोबत काही भागात गाराही पडल्या. पावसामुळे फळपिक शेतक-यांना मोठ्या नुकसान सहन करावे लागणार आहे. गेल्या आठवड्यातही जिल्ह्याच्या काही भागात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला होता. या पावसामुळेही शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.कै-यांचे मोठे नुकसानवादळी वा-यामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या झाडाला कै-या आहेत. तसेच अनेक आंबा काढणीस आला आहे. वादळामुळे कै-या पडल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 4:56 PM