राहुरी : पुढील पाच दिवस पाऊस दांडी मारणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृ षी विद्यापीठाने हवामानानुसार पिकांवर औषध फवारणीचा सल्ला दिला आहे़ रोग-किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.हवामान अंदाजावर आधारित राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे़ हुमणीचा ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे़ हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ०़३ टक्के दाणेदार कीटकनाशक ३३ किलो प्रति हेक्टर या प्रमाणावर पसरावे़ कपाशीचे पीक ७० दिवसांचे झाल्यानंतर शेंडे खुडावेत़ त्यामुळे वाढ होऊन फलधारणा होईल़ पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना ७५ मिली १० लीटर पाण्यात मिसळून कपाशीवर फवारणी करावी़ बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एच़एऩपी़व्ही़ हे जैविक विषाणू हेक्टरी ५०० एल़ ई़ १५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ज्वारी पिकावर मावा तुडतुडे याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्हर्टीसिलीयम लेकॅनी ७५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला कृ षी विद्यापीठाने दिला आहे़ सोयाबीन पिकातील मोठमोठे तण हाताने काढून घ्यावे़ सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनीलीप्रोल १८़५ टक्के प्रवाही ३ मिली, प-ल्युबेन्डामाईड ३९़३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा लफेनुरॉन ५़४ टक्के प्रवाही १२ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारावे, असा सल्ला देण्यात आला आहे़कांद्यावरील करपा व टाक्या यांच्या एकत्रित रोग व कीड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर ३० गॅ्रम डायथेन एम-४५ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इ़सी १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आर्द्रता ७४ ते ७७ टक्के राहील. किमान आर्द्रता ४९ ते ५७ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र आंधळे यांनी सांगितले.
पाऊस गायब; पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:46 PM