राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात येत्या १८ फेब्रुवारी रोजी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागप्रमुख प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण नगर जिल्ह्यात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, नगर आदी तालुक्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर आदी तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या तीन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडी ही गायब होण्याच्या मार्गावर आहे. हा पाऊस हरभरा पिकासाठी धोकादायक ठरू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हरभरा सोंगला असल्यास तो झाकून ठेवावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
....
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुलनेत उत्तर नगर जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाची काळजी घ्यावी.
- प्रा. रवींद्र आंधळे,
हवामान विभागप्रमुख,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
...