कर्जत : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र बापूसाहेब गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचायत समितीचे उपसभापती मंगेश मोरे यांनी राजीनामा दिला होता. यामुळे हे पद रिक्त होते. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक पार पडली. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. या बैठकीला सभापती मनीषा जाधव, पंचायत समिती सदस्य प्रशांत बुद्धीवंत, साधना कदम, हेमंत मोरे, बाबासाहेब गांगर्डे उपस्थित होते. उपसभापती पदासाठी राजेंद्र गुंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामुळे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. राजेंद्र गुंड हे कुळधरण गणाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व समर्थकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, जळकेवाडीचे सरपंच किरण पावणे, किसन कासारे, सतीश कळसकर, सुरेश सुपेकर आदी उपस्थित होते.
-----
३० राजेंद्र गुंड