नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील राकेश ईश्वरलाल मुथा यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावकडून पीएच.डी. प्रदान करण्यात आली. शिरपूर, जि. धुळे येथील एच.आर. पटेल फार्मसी महाविद्यालयात ते सध्या कार्यरत आहेत. प्राचार्य प्रा. डॉ. संजय सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ्लेव्होनॉइड बेस्ड नॅनोपार्टिक्युलेट ड्रग डेव्हलपमेंट सिस्टीमचे सूत्रीकरण आणि मूल्यांकन’ या विषयावर प्रबंध सादर केला. ४ मे २०२१ रोजी विद्यापीठ नियुक्त समितीसमोर प्रबंधाचे यशस्वीपणे सादरीकरण करून पीएच.डी. मिळवली. राकेश मुथा यांची विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक संशोधनपत्रके प्रकाशित झाली आहेत. २०१५ आणि २०१९ मध्ये विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत संशोधन कार्यासाठी अनुक्रमे द्वितीय व प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ते येथील व्यापारी ईश्वरलाल मोतीलाल मुथा यांचे चिरंजीव आहेत.
---
०५राकेश मुथा