अहमदनगर : केंद्र व राज्य पुरस्कृत शिक्षण व परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.ओबीसी, एस्सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती मिळावी, शासनाचे आॅनलाइन पोर्टल विनाअडथळा सुरळीत चालावे, एसआयटीमुळे रखडलेली शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, यंदाचे अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शासन दरबारी प्रलंबित आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी, विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे परीक्षा शुल्क व शिष्यवृत्ती मिळावी, अशा मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, श्रीगोदा तालुकाध्यक्ष विशाल लगड, गहिनीनाथ दरेकर, वैभव ढाकणे, अमित खामकर, वैभव म्हस्के, साहेबान जहागीरदार, अक्षय भिंगारदिवे, सिध्दार्थ भिंगारदिवे, सागर खेंगट, युवराज सुपेकर, दादा शिंदे, सोनू दरेकर, कांताशेठ अष्टेकर, प्रसाद टकले, प्रविण येलुलकर, आदित्य येलुलकर, सोमेश देवकर, शुभम पटेकर, देवीदास टेमकर, ओमकार गोंडाळकर, मनोज कोतकर आदी उपस्थित होते.
परीक्षा शुल्क मिळण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:12 PM