शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

नरेंद्र मोदी चौकीदार है, बाकी सब भागीदार है; रामदास आठवलेंची खास कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 4:42 PM

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेत रामदास आठवलेंच्या शीघ्रकवितांनी चांगला प्रतिसाद मिळवला.

 अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज सकाळी साडेअकरा वाजता पार पडली. यावेळी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या शीघ्रकवितेला चांगलाच प्रतिसाद मिळविला. यावेळी नरेंद्र मोदी यांचे आठवलेंनी भरभरून कौतुक केले. 

आठवले म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री कार्यसम्राट नरेंद्र मोदीजी काही मिनिटातच येथे येणार आहेत. डॉ. सुजय विखे तरूण आहे. मी सारखा विचार करत होतो. मी त्यांना सोडून इकडे आलोय. तुम्ही तिकडे काय करता. सुजयने अतिशय चांगला निर्णय घेतला. अन तो भाजपात आला. मागच्या वेळेस मी शिर्डीत पडलो. पडलो पण लगेच उभा राहिलो. एकटाच नाही पडलो त्यांना सुध्दा पाडले. बाळासाहेब विखे पाटील मला दिल्लीत भेटायचे. ते मला म्हणायचे तुम्ही शिर्डीत या. मी त्यांना म्हणायचो तुम्ही तिथे जा. पण त्यांना अहमदनगरची जागा दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे दोन्ही जागांवर आघाडीचा पराभव झाला.आता मला तिकिट काही मिळाले नाही. म्हणून मी नाराज होतो. पण नाराज होऊन जायचे कुठे. काँग्रेस-राष्ट्रवादी खायलाच महाग आहेत. मी तिकडूनच आलोय. त्यामुळे इथचं थांबू म्हटलं. मला माहिती आहे कुठून अन कसं मिळवायचं, असेही आठवले म्हणाले.

काय म्हणाले, आठवले...

संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके,आणि निवडून येणार आहेत सुजय विखे...आता हे लोक राहिले नाहीत मुके, मग का निवडून येणार सुजय विखे...

आम्हाला नको आहेत,तुमच्याकडून फक्त फुलांचे बुकेआम्हाला नको आहेत, तुमच्याकडून फक्त फुलांचे बुकेआम्हाला तर हवे आहेत,डॉ.सुजय विखे

मी इथे आलो आहे,सुजयला आणि सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी...आणि मी मुंबईला जात आहे,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बदला घेण्यासाठी....मी इथे आलो आहे,तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी...मी दिल्लीला जात आहे,मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी...

नरेंद्र मोदीजी अंगार है,बाकी सब भंगार है नरेंद्र मोदीजी चौकिदार है, बाकी सब भागीदार है 

महाराष्ट्रात आता सोबत आहे भाजप-शिवसेनात्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा दैना

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019