नेवासा (जि. अहमदनगर) : नारायण राणे हे भाजपमध्ये अस्वस्थ असून त्यांना तेथे चुकल्या-चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे राणेच काय, भविष्यात राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसमध्ये येताना दिसतील, असे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणे यांच्या ‘घरवापसी’चे संकेत दिले.माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या भाजपचे खासदार आहेत. नुकतेच त्यांना भाजपाच्या निवडणूक जाहीरनामा समितीत घेण्यात आले आहे. गत महिन्यात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राणे यांची सिंधुदुर्ग येथे भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये बंदद्वार तासभर चर्चा झाल्याने राणे राष्टÑवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती.भाजपा-शिवसेनेची युती झाली तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचा उमेदवार असेल. त्यामुळे राणे पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आल्याने थोरात यांच्या वक्तव्याला महत्व आलेआहे. २००५ साली राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नाराज झालेल्या राणेंनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाहीर वक्तव्य केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. मात्र, माफीनाम्यानंतर त्यांची ‘घरवापसी’ झाली. राणे काँग्रेसमध्ये परतले तरी, ते अस्वस्थच होते. त्यामुळे २०१७ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाची स्थापना केली.दरम्यान, भाजपाने राणेंना राज्यसभेची खासदारकी दिल्याने त्यांनी स्वत:च स्थापन केलेल्या पक्षाचा राजीनामा दिला. राणेंची आजवरची कारकीर्द बघता ते फार काळ एका ठिकाणी रमत नसल्याचे दिसून येते.>पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चाभाजपा-शिवसेनेची युती झाली तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचा उमेदवार असेल. त्यामुळे राणे पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आल्याने थोरात यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; थोरातांनी दिले ‘घरवापसी’चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:18 AM