अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील टोणपेवस्तीवर शेतकऱ्यांना नवीन १०० केव्हीचे रोहित्र तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कुकडे यांच्याकडे केली.
काकडे म्हणाल्या की, टोणपेवस्तीवर बेंदवस्ती रोहित्रावरून शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. बेंद वस्तीवरील रोहित्र ६३ केव्हीचे असून त्यावर जवळपास १५० हून अधिक शेतकरी आपले वीज पंप चालवतात. त्यामुळे त्या रोहित्रावर ताण येऊन काही शेतक-यांना वीज पंप चालवता येत नाहीत. त्यामुळे बेंद वस्तीवरील दाब कमी करून टोणपे वस्तीवर नवीन १०० केव्हीचे रोहित्र बसवले तर सर्व शेतक-यांना वीज मिळेल. त्यामुळे हे नवीन रोहित्र मंजूर करावे, असे काकडे यांनी उपकार्यकारी अभियंता कुकडे
यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नवनाथ खेडकर, रघुनाथ गाढवे, भागवत मुलमुले, नवनाथ बिबे, महादेव खेडकर, अदिक गाढवे, तुकाराम बिबे, नारायण गाढवे, पंडित खेडकर, अभिषेक बिबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------
फोटो ओळी - ०९ काकडे निवेदन
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील टोणपेवस्तीवर शेतकऱ्यांना नवीन रोहित्र बसवून द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी महावितरण अधिका-याकडे दिले.