अहमदनगर : मकर संक्रांतनिमित्त पतंगबाजीचा आनंद दुर्बल घटकातील मुलांना घेता यावा, या भावनेने स्टुडंट पॉवर फाउंडेशन, संघर्ष प्रतिष्ठान यांच्यावतीने नारायणडोह (ता. नगर) येथील तळ्याचा मळा येथे उपेक्षित घटकातील पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. सामाजिक बांधीलकी जोपासत युवक-युवतींनी हा उपक्रम राबविला.
केअरिंग फ्रेंडस संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पूजा बालसंस्कार केंद्रातील मुलांबरोबर साजरा झालेल्या या पतंगोत्सव कार्यक्रमात फाऊंडेशनचे संस्थापक तथा सचिव मोहसीन सय्यद, स्वाती खिळदकर, निशाद शेख, सय्यद मुस्तमीर, आरिश शेख, केअरिंग फ्रेंड्सचे संस्थापक अध्यक्ष युवराज गुंड, संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आदींसह युवक-युवती उपस्थित होते.
तळ्याचा मळा येथे मोठ्या प्रमाणात उपेक्षित वंचित समाजातील काही कुटुंब वास्तव्यास आहेत. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केअरिंग फ्रेंडस संस्थेद्वारे पूजा बालसंस्कार केंद्र चालविले जाते. या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, संस्कार व मूल्य रुजविण्याचे कार्य बालसंस्कार केंद्र करीत आहे. या बालकांना पतंगबाजीचा आनंद लुटता यावा यासाठी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बालकांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.
--फोटो-१४ नारायणडोह
मकर संक्रांतनिमित्त नारायणडोह (ता. नगर) तळ्याच्या मळा येथे उपेक्षित घटकातील मुलांसमवेत पतंग महोत्सव साजरा करताना मोहसीन सय्यद, स्वाती खिळदकर, निशाद शेख, सय्यद मुस्तमीर, आरिश शेख, युवराज गुंड, आदी उपस्थित होते.