श्रीगोंदा : तालुक्यातील सांगवी येथील एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फिर्यादीस मागे घेण्यास सांगतो. हवे तसे लिहून देतो. त्यासाठी तुम्हास ३० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी जीवा भानुदास घोडके (रा.श्रीगोंदा) याने केली आहे. याबाबतची फिर्याद दादासाहेब लक्ष्मण नलगे यांनी पोलिसात दिली आहे.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अॅड.अक्षयकुमार जठार यांच्या श्रीगोंदा येथील कार्यालयात जीवा घोडके आला. तो जठार यांना म्हणाला की, तुमच्या पाहुण्यांच्या विरोधात मुलीने दिलेली अत्याचाराची फिर्याद मी मागे घेण्यास सांगतो. हवे तसे मी तुम्हास लिहून देतो. पण त्यासाठी ३० लाखाची रक्कम मला द्या, अशी मागणी केली. दादासाहेब नलगे यांनी घोडके याने जठार यांच्याशी केलेले संभाषण व सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. या सीसीटीव्ही कॅमेरेतील फुटेजवरून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यास सांगितले आहे.
अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:05 PM