शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

कोरोनामुळे रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:05 AM

यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडल्याचे दिसते.

संजय सुपेकर । बोधेगाव : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की रसवंतीगृहावर गर्दी पाहायला मिळत असते. परंतु, यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडल्याचे दिसते.

शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील बालमटाकळी, चापडगाव, लाडजळगाव, हातगाव, कांबी, मुंगी आदी गावात अनेक बेरोजगार तरूण उन्हाळ्यात रसवंतीचा व्यवसाय करतात. काही व्यवसायिकांनी फेब्रुवारी दरम्यान रसवंती गृह उभारली तर काहींनी सुरूवातीला ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटका वाढल्यानंतर मार्च महिन्यात रसवंतीगृह चालू केले. परंतु, कोरोनाचा कहर वाढतच असल्याने प्रशासनाने २३ मार्चला लॉकडाऊन घोषित करून सर्वच उद्योग-व्यवसाय बंद केले. दोन महिन्यानंतर आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योगधंद्यांना उघडण्यास सध्या परवानगी मिळाली आहे. मात्र यामध्ये रसवंतीगृहाचा समावेश नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा हंगाम आवरत आला तरी अद्यापही सुरू करता आलेला नाही.

बोधेगावात शासकीय डाकबंगला परिसरातील गॅरेज कॅम्पसजवळ सोनविहीर येथील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब विखे यांनी मार्चमध्ये जवळपास ३० ते ४० हजार रूपये खर्चून रसवंतीसाठी लाकडी चरक असलेला गाडा बसवला होता. परंतु, बैल जुंपून चरक फिरण्याआधीच लॉकडाऊन घोषित झाले. साधारणत: दोन महिने उलटले तरी उद्योग करता न आल्याने त्यांना जमिनीत गाडलेला लाकडी चरक पावसापाण्यात खराब होऊ नये म्हणून सोमवारी (दि.२५) काढून घ्यावा लागला आहे. या व्यवसायात हजारो रूपयांची गुंतवणूक करून उद्योग बंदच राहिल्याने रसवंतीगृह व्यवसायिक मात्र अडचणीत सापडले आहेत. तर रसवंतीसाठी ऊस लागवड केलेल्या शेतक-यांनाही याची झळ बसली आहे. 

रसवंती चालू करण्यासाठी व्याजाने पैसे काढून पाथर्डी तालुक्यातून नवा लाकडी चरक विकत आणला. चरक फिरायला एक बैलही उपलब्ध केला. परंतु लॉकडाऊन मुळे चरक बिंगलाच नाही. यामुळे मोठी आर्थिक झळ बसली आहे.    - बाबासाहेब विखे, रसवंती व्यवसायिक, सोनविहीर, ता. शेवगाव 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावcorona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल