शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

‘मिनिस्टर नव्हे होम मिनिस्टर’ स्पर्धेला सखींचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 10:31 PM

अहमदनगर : कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ तर्फे सभासद झालेल्या सखींसाठी मिनिस्टर नव्हे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

अहमदनगर : महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ तर्फे सभासद झालेल्या सखींसाठी मिनिस्टर नव्हे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सखींनी स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली. बक्षिसे पटकावणाऱ्या सखींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.बुधवारी सकाळी ११ वाजता भूषणनगर, रभाजी कोतकरनगर, दुपारी २ वाजता इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय भवानीनगर, सायंकाळी ४ वाजता गायत्री मंदिर पटांगण, महाजन गल्ली या ठिकाणी मिनिस्टर नव्हे होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली. टिकल्या लावणे, फोर कॉर्नर, म्युझिकल रिंग यासह विविध स्पर्धा पार पडल्या. विहीत वेळेत दिलेली कृती पूर्ण करण्यासाठी स्पर्धक सखींची धावपळ झाली. वातावरणातील उत्साह इतर सखींची उत्कंठा वाढवत होता.सखींना ‘लोकमत सखी मंच’च्या सभासद होण्याची संधी आहे. कार्यक्रम स्थळीदेखील सखींना सभासद होता येणार असून सभासद झालेल्या सखींना मिनिस्टर नव्हे होम मिनीस्टर मध्ये सहभागी होता येईल.स्पर्धेत विजयी होणाऱ्या सखींना कार्यक्रमाचे गिफ्ट सुविधा मार्केटचे ज्ञानेश्वर गाडे, सुनीता गाडे, सुहानाचे प्रमोद देशमुख, महानंदाच्या अनिता सोनी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी मंच विभाग प्रतिनिधी अलका मुंदडा, वर्षा पितळे, बबीता गांधी यांनी सहकार्य केले.सदरील कार्यक्रमास महानंदा ग्रुपचे प्रायोजकत्व लाभाले आहे. तसेच गिफ्ट प्रायोजक म्हणुन सुविधा मार्केट व सुहाना मसाले यांचे सहकार्य लाभाले आहे.