राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. कोतुळ येथे ९ मिलिमीटर तर मुळानगर येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतूळ येथून ३ हजार ८२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणात ५५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १४ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ४५.५८ टक्के इतका आहे. मुळा धरणात उपयुक्त पाणीसाठा ९ हजार ८०० दशलक्ष घनफूट इतका आहे.
मुळा धरणात सोमवारी २४५ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी जमा झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणात ७ हजार ५८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नव्याने जमा झाला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटे पावसाने हजेरी लावली.